Join us  

IPL 2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईतील सामने इतरत्र हलवणार?; BCCI चा बॅक-अप प्लान तयार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 3:48 PM

Open in App
1 / 9

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलला सुरुवात होणार आहे. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली येथे खेळवले जाणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १० एप्रिलला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.

2 / 9

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णाची संख्येनं चेन्नई सुपर किंग्स ( CSK), दिल्ली कॅपिटल्सा ( DC), राजस्थान रॉयल्स ( RR), कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) आणि पंजाब किंग्स ( PBKS) फ्रँचायझींची चिंता वाढवली आहे.

3 / 9

KKRचा नितीश राणा ( Nitish Rana), वानखेडे स्टेडियमचे ८ कर्मचारी, DCचा अक्षर पटेल ( Axar Patel) व CSKच्या कंटेन्ट टीममधील सदस्य यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईत आयपीएलचे सामने होणार की नाही, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

4 / 9

''स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अशा बातम्या समोर आल्यावर चिंता वाटणारच. सर्वांनी नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे, परंतु अशा बातम्यांनी भीती वाटते. आम्ही ही परिस्थिती हलक्यात घेऊ शकत नाही,''असे एका फ्रँचायझीनं ANI ला सांगितले.

5 / 9

''हा सर्वांसाठी वेक अप कॉल आहे. बायो-बबलमध्ये गेल्यानंतर सर्वजण रिलॅक्स झाले आहेत, परंतु प्रत्येकानं नियमांचं पालन करायलाच हवं आणि कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,''असे दुसऱ्या फ्रँचायझीने सांगितले.

6 / 9

महाराष्ट्रात शनिवारी ४७,९१३ कोरोना रुग्ण आढळले आणि मुंबईत ९००० रुग्ण सापडले. त्यात फ्रँचायझीच्या सदस्यांनाही कोरोना झाल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. बीसीसीआयनंही नियमांचं काटेकोर पालन होतंय की नाही, यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

7 / 9

चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांनी सांगितले की,सर्व फ्रँचायझींमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहोत. बीसीसीआय आणि आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. आम्ही चिंतीत आहोत आणि ते स्वाभाविक आहे. अजूनही परिस्थिती आटोक्यात आहे.

8 / 9

या परिस्थितीत बीसीसीसीआय मुंबईतील सामने इतरत्र हलवण्याचाही विचार करत आहे. हैदराबाद हा पर्याय समोर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत आणि पुढील ४८ तासांत परिस्थिती न सुधारल्यास मुंबईतील सामने हलवले जातील, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं Indside Sports ला सांगितले होते.

9 / 9

कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील अत्यंत वरिष्ठ आणि विश्वसनीय सूत्रांनी 'लोकमत'ला दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं समजतं.

टॅग्स :आयपीएलमुंबईउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्सअक्षर पटेल