IPL 2021, Mukesh Ambani : मुंबई इंडियन्सचा शानदार विजय अन् हवा झालीय मुकेश अंबानी यांची; पाहा भन्नाट मीम्स

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सनं ( MI) आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सवर ८ विकेट्स व ७० धावा राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर मुंबईनं १२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि प्ले ऑफच्या आशा जीवंत राखल्या आहेत.

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सनं ( MI) आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सवर ८ विकेट्स व ७० धावा राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर मुंबईनं १२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि प्ले ऑफच्या आशा जीवंत राखल्या आहेत. जिमी निशॅम ( ३-१२) व नॅथन कोल्टर-नायल ( ४-१४) यांनी मिळून सात विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहच्याही नावावर २ विकेट्स राहिल्या.

मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ५६ धावा केल्या. पण, इशान किशन आज सुसाट होता, त्यानं चेतन सकारियानं टाकलेल्या ८व्या षटकात २४ धावा कुटल्या. मुंबईनं ८.२ षटकांत २ बाद ९४ धावा करून हा सामना जिंकला. इशान किशननं २५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. मुंबईच्या या विजयानंतर संघ मालक मुकेश अंबानी ( Mukesh Ambani) यांचे भन्नाट मीम्स व्हायरल झाले.