Join us  

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या संघानं ठेवला आदर्श; दुबईत जपला 'स्वदेशी' मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 5:04 PM

Open in App
1 / 11

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमासाला सुरुवात होण्यासाठी अवघे 24 दिवस शिल्लक आहेत. संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेबंरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत.

2 / 11

दुबई, अबु धाबी आणि शाहजाह येथे आयपीएलचे सामने होणार आहेत आणि येथे दाखल झाल्यानंतर खेळाडू 6 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहेत. येथे प्रत्येक संघानं राहण्यासाठी आलिशान हॉटेल बूक केलं आहे. दुबईतील ओबेरॉय हॉटेल हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं ( बीसीसीआय) राहण्यासाठीचं ऑफिशियल हॉटेल आहे.

3 / 11

अन्य 8 संघांनी त्यांच्या आवडीनुसार हॉटेलची निवड केली आहे. त्यापैकी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघानं भारतीय हॉटेल निवडले आहे.

4 / 11

कोलकाता नाइट रायडर्स - रित्झ कार्ल्टन, अबु धाबी - कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक शाहरुख खाननं अबुधाबी येथील रित्झ कार्ल्टन हॉटेलची निवड केली आहे.

5 / 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - वॅल्डोर्फ अॅस्टोरिया, दुबई - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ दुबईतील वॅल्डोर्फ अॅस्टोरिया हॉटेलमध्ये राहत आहे.

6 / 11

सनरायझर्स हैदराबाद- अनंतारा दी पाल्म दुबई रेसॉर्ट

7 / 11

किंग्स इलेव्हन पंजाब - सोफिटेल दी पाल्म, दुबई

8 / 11

दिल्ली कॅपिटल्स - पॅलेस डॉऊनटाऊन, दुबई

9 / 11

राजस्थान रॉयल्स - वन अँड ओन्ली दी पाल्म, दुबई

10 / 11

मुंबई इंडियन्स - सेंट रेगीस, सादियात आयलँड रेसॉर्ट, अबु धाबी

11 / 11

चेन्नई सुपर किंग्स - ताज, दुबई - महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव संघ आहे की ज्यांनी दुबईत राहण्यासाठी भारतीय हॉटेलची निवड केली आहे.

टॅग्स :आयपीएल 2020कोलकाता नाईट रायडर्सकिंग्ज इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स