लसिथ मलिंगाने तीन विकेट्स मिळवत दमदार कामगिरी केली.
हार्दिक पंड्याने कोलकाताच्या दोन्ही सलामीवीरांना आऊट केले.
जसप्रीत बुमरानेही यावेळी दोन बळी मिळवले.
आंद्रे रसेलला यावेळी एकही धाव करता आली नाही. पहिल्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला.
रोहित शर्माने नाबाद अर्धशतक झळकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सामना संपल्यावर रसेलने मुंबईच्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
मुंबईने विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.