गौतम गंभीर हा आयपीएलच्या सुरुवातीला दिल्ली डेअर डेव्हिल्स या संघात होता. तीन हंगामानंतर गंभीरने दिल्लीचा संघ सोडला आणि कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल झाला.
कोलकाता नाइट रायडर्स संघातून २०१८ साली गंभीर पुन्हा दिल्लीच्या संघात दाखल झाला.
डेल स्टेन हा २००८-१० या कालामधीमध्ये आरसीबीच्या संघात होता. त्यानंतर २०१० साली स्टेन हा डेक्कन चार्जर्सच्या संघात सामील झाला होता.
स्टेन यावर्षी पुन्हा एकदा आरसीबीच्या संघात दाखल झाला. पण दुखापीतीमुळे स्टेन फक्त दोनच सामने खेळू शकला.
मनदीप सिंग हा २०१० साली किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात होता. २०१४ साली मनदीपने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात स्थान मिळवले.
मनदीप २०१९ साली पुन्हा एकदा आरसीबीमधून पंजाबच्या संघात परतला.