क्विंटन डीकॉकने अर्धशतक झळकावत संघाला १६२ धावा करून दिल्या.
जसप्रीत बुमराने मुंबईला चांगली सुरुवात करून दिली.
बुमराने हैदराबादच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले.
मनीष पांडेने हैदराबादचे आव्हान अर्धशतक झळकावून जीवंत ठेवले.
अखेरच्या चेंडूवर मनीष पांडेने षटकार मारल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
बुमराने सुपर ओव्हरमध्ये भेदक मारा करत हैदराबादच्या दोन्ही फलंदाजांना बाद केले.
सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने षटकार मारला आणि मुंबईचा विजय सुकर झाला.
सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ९ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला.