इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांत सनरायझर्स हैदराबाद हे नाव आघाडीवर नसेलही, परंतु सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर हा संघा भल्याभल्या संघांना नमवण्याची धमक राखतो. चेंडू कुरतडण्याप्रकरणी बंदीच्या शिक्षेस पात्र ठरलेला डेव्हीड वॉर्नर यंदा कमबॅक करणार आहे. 2018मध्ये त्याच्या अनुपस्थितीत केन विलियम्सनने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती आणि हैदराबादने अंतिम फेरीत प्रवेश केला. पण, चेन्नई सुपर किंग्सने त्यांना पराभव मानण्यास भाग पाडले. यंदा मात्र हा संघ जेतेपदाची ती कसर भरून काढण्यास उत्सुक आहे. वॉर्नरच्या पुनरागमनाने संघ आणखी मजबूत झाला आहे. त्याच्या जोडीला विलियम्सन, रशीद खान, मार्टिन गुप्तील आणि शकिब अल हसन ही फौज आहेच. पाहूया हैदराबाद संघाचे टॉप खेळाडू...
डेव्हिड वॉर्नर
मार्टिन गुप्तील
केन विलियम्सन
मनिष पांडे
विजय शंकर
युसूफ पठाण
दीपक हुडा
वृद्धीमान साह
रशीद खान
भुवनेश्वर कुमार
सिद्धार्थ कौल
संदीप शर्मा
टी नटराजन