कोलकाता, आयपीएल 2019 : नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी केलेल्या दमदार फटकेबाजीनं कोलकाता नाइट रायडर्सला विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले. एका वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या वॉर्नरच्या ( 85) फटकेबाजीनं हा सामना गाजवला, परंतु आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकात विजय खेचून आणला आणि वॉर्नरच्या खेळीवर पाणी फिरवलं. रसेलनं 19 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 49 धावा केल्या. मैदानावरील या अविश्वसनीय कामगिरीनंतर रसेल स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका खास प्रेक्षकाला भेटला आणि त्याच्या या कृतीनं साऱ्यांची मनं जिंकली. कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक आणि बॉलिवूडचा शहनशाह शाहरुख खान, ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनीही त्या विशेष व्यक्तीची भेट घेतली.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- IPL 2019 : आंद्रे रसेलनं घेतली 'विशेष' व्यक्तीची भेट, जिंकली साऱ्यांची मनं
IPL 2019 : आंद्रे रसेलनं घेतली 'विशेष' व्यक्तीची भेट, जिंकली साऱ्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 16:00 IST