Join us

IPL 2019: कोलकाता-हैदराबाद सामन्यात 'हे' खेळाडू ठरतील गेम चेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 13:29 IST

Open in App
1 / 5

कोलकाता, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात दुसरा सामना होणार आहे तो, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन माजी विजेत्यांमध्ये. इडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ आयपीएलच्या हंगामाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी आतुर आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनामुळे हैदराबाद संघातील खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. पण, या सामन्यात वॉर्नरसह चार खेळाडू गेम चेंजरची भूमीका निभावू शकतात..

2 / 5

डेव्हिड वॉर्नर : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एका वर्षांची बंदी संपवून डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करून वर्ल्ड कपसाठीची तयारीही त्याला करायची आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची सर्वांना उत्सुकता आहे.

3 / 5

आंद्रे रसेल : कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल एकहाती सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता राखतो. वेस्ट इंडिजचा हा खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाडींवर प्रतिस्पर्धींसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

4 / 5

रशीद खान : अफगाणिस्तानच्या रशीद खाननं ट्वेंटी-20 प्रकारात आपली मक्तेदारी कायम राखली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा तो एक प्रमुख अस्त्र आहे. जागतिक ट्वेंटी-20 क्रमवारीत रशीद अव्वल स्थानावर आहे.

5 / 5

दिनेश कार्तिक : वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याच्या आशा अजूनही पल्लवीत ठेवून दिनेश कार्तिक यंदा आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.

टॅग्स :आयपीएल 2019आयपीएलडेव्हिड वॉर्नरदिनेश कार्तिककोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद