Join us

त्या घटनेचा दुसरा पैलू आला समोर; संगिता बिजलानीमुळे फॅन्सला मारायला गेला पाकिस्तानी क्रिकेटपटू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 17:32 IST

Open in App
1 / 8

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकला हा त्याच्या शांत स्वभावानं ओळखला जातो. पण, 1997चा सहारा चषक स्पर्धेतील दुसरा सामना सुरु असताना तो चक्क फॅन्सला मारण्यासाठी गेला होता.

2 / 8

या सामन्यात फॅन्स त्याला 'आलू आलू...'असे बोलवत होते आणि त्यानंतर त्याचा पारा चढला आणि तो फॅन्सला मारण्यासाठी धावला.

3 / 8

पण, ही गोष्ट खरी नाही. पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनिसनं या घटनेचा दुसरा पैलू सांगितला.

4 / 8

इंझमाम-उल-हक याचा पारा चढण्यामागचं कारण हे भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याची पत्नी संगीता बिजलानी होती.

5 / 8

तेव्हा अझरुद्दीन टीम इंडियाचा कर्णधार होता. तेव्हा इंझमाम प्रचंड भडकला आणि गर्दीत घुसून फॅन्सला ओढत मैदानावर घेऊन आला.

6 / 8

इंझमाम-उल-हकचा ते रुप कोणीच विसरू शकत नाही. त्याच्या तावडीतून फॅन्सला सोडवण्यात आले, परंतु त्यानंतरही बॅट घेऊन तो त्याला मारायला गेला होता.

7 / 8

वकारने 23 वर्षांपूर्वीच्या या किस्स्याची दुसरी बाजू सांगितली. एका कार्यक्रमात बोलताना वकार म्हणाला,''तेथे काही लोकं त्याला आलू म्हणून बोलवत होते. पण, तो त्यामुळे भडकला नाही. त्या फॅन्समध्ये एक व्यक्ती खुप अश्लिल शेरेबाजी करत होता. तो अझरुद्दीनच्या पत्नीबद्दल अपशब्द बोलत होता. तेव्हा इंझीचा पारा चढला.''

8 / 8

इंझी आणि अझरुद्दीन यांच्यात चांगली मैत्री होती आणि त्यामुळेच तो फॅनला मारायला गेला.

टॅग्स :भारतपाकिस्तान