भारताच्या कसोटी संघात करुण नायरने इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे खेळताना त्रिशतक झळकावले होते.
त्रिशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.
करुण आज शनायाबरोबर लग्न बंधनात अडकला.
या दोघांचे बराच वर्षांपासून अफेअर सुरु होते.
करुणने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर शनायाला लग्नासाठी प्रपोज केले होते.
आज या दोघांनी काही मोजक्या पाहुण्यांबरोबर लग्न केलं.
करुण आणि शनाया यांनी दक्षिण भारतीय रिती-रिवाजानुसार लग्न केले.
या दोघांनी उदयपूर येथे लग्न केले.
करुण नायरच्या आडनावावरुन तो दक्षिण भारतातला आहे, असे तुम्हाला वाटत असेल. पण त्याचा जन्म राजस्थानमधील जोधपूरचा आहे.
करुण आणि शनायाला कर्नाटकच्या क्रिकेट संघाने शुभेच्छा दिल्या आहेत.
त्रिशतक झळकावल्यावरही त्यानंतरच्याच सामन्यात करुणला भारतीय संघातून वगळण्यात आले होते.
आता या दुसऱ्या डावाची करुण कशी सुरुवात करतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.