Join us
Daily Top 2Weekly Top 5

PHOTOS : स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडने चाहत्यांना खुशखबर दिली; कपलने केक कापून आनंद साजरा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:59 IST

Open in App
1 / 10

भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत स्मृतीने चमकदार कामगिरी केली. ती तिच्या खेळीशिवाय सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

2 / 10

ग्लॅमरस लूकने चाहत्यांचे लक्ष वेधणारी 'नॅशनल क्रश' अर्थात स्मृती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरे तर स्मृती आता तिच्या लव्ह लाईफमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.

3 / 10

स्मृती मानधनाचे तिच्या प्रियकरासोबतचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंवरून नेटकऱ्यांनी तिच्या लग्नाचा तर्क लावला. लेटेस्ट फोटोंमध्ये स्मृती तिचा प्रियकर पलाश मुच्छलसोबत दिसत आहे.

4 / 10

स्मृती मानधना पलाशसोबत केक कापताना दिसत आहे. पलाशने हे फोटो शेअर करताना #५ असे सूचक कॅप्शन दिले.

5 / 10

स्मृती आणि पलाश यांच्या रिलेशनशिपला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने त्यांनी केक कापून आनंद साजरा केला. पलाशच्या या पोस्टवर नामांकित कलाकारांनी कमेंटच्या माध्यमातून या कपलला शुभेच्छा दिल्या.

6 / 10

दरम्यान, पलाश हा इंदौरचा रहिवाशी असून तो पेशाने एक गायक आहे. गतवर्षी २०२३ मध्ये स्मृती आणि पलांश दोघांच्या रिलेशनशीपचे वृत्त माध्यमांत आले. आता पलाशने शेअर केलेल्या फोटोंवर स्मृतीनेही कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला.

7 / 10

पलाशने एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गाऊन ते स्मृतीला डेडिकेट केले होते, तर आय लव्ह यू टू स्मृती... असेही त्याने म्हटले होते. महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये स्मृतीचा संघ चॅम्पियन झाल्यानंतर दोघांमधील प्रेमाची जादू की झप्पी पाहायला मिळाली होती.

8 / 10

भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकून पाहुण्या आफ्रिकेने विजयी सलामी दिली.

9 / 10

ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. त्यामुळे मंगळवारी होत असलेला अखेरचा सामना निर्णायक आहे. हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे मोठे आव्हान यजमान भारतासमोर आहे.

10 / 10

टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघसेलिब्रिटीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट