भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू हर्लीन देओल ( Harleen Deol) हिनं फलंदाजीत आपली छाप पाडली आहेच, परंतु तिला ब्यूटी क्वीन असेही संबोधले जाते.
हर्लीन तिच्या इंस्टाग्रामवर नेहमीच फोटो पोस्ट करते आणि फॅन्सनाही ते आवडतात. ती खूप स्टायलिस्ट आहे आणि ती फिटनेसवरही खूप लक्ष देते. तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
भारतीय महिला क्रिकेटपटू हर्लीननं सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत आणि पारंपरिक वेशात ती आणखी सुंदर दिसतेय. तिच्या या देसी अवतारनं चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे.
तिनं पोस्ट केलेले फोटो हे कुणाच्या तरी लग्नातील आहेत आणि त्यात ती रुपेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय
२३ वर्षीय हर्लीननं २२ फेब्रुवारी २०१९मध्ये वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिनं आतापर्यंत १ वन डे व १३ ट्वेंटी-२० सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.