Join us

बजरंगबलीची भक्त आहे ही महिला क्रिकेटर; जाणून घ्या तिच्या हातावरील टॅटूसंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:48 IST

Open in App
1 / 10

भारतीय संघाने महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या १३ व्या हंगामाची सुरुवात दिमाखदार विजयाने केली. संघ अडचणीत असताना दीप्ती शर्मा मदतीला धावली अन् तिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने पहिली बाजी मारली.

2 / 10

घरच्या मैदानात टीम इंडिया इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकायची असेल तर त्यात दीप्ती शर्मालाही आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवावे लागेल.

3 / 10

इथं जाणून घेऊयात वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी भारतीय महिला संघाच्या ताफ्यातील ताकद असलेल्या महिला क्रिकेटरला सर्वोत्तम कामगिरीसाठी बळ देणाऱ्या तिच्या हातावरील खास टॅटू मागची गोष्ट

4 / 10

दीप्ती ही बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात धमक दाखवून सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारी खेळाडू आहे. त्यामुळेच टीम इंडियाची ती मोठी ताकद आहे.

5 / 10

दीप्ती शर्मा ही बजरंगबलीची भक्त आहे. तिने आपल्या डाव्या हातावर हनुमानजींचा खास टॅटू काढला असून यात जय श्री राम असेही लिहिल्याचे दिसून येते.

6 / 10

वर्ल्ड कप स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी दीप्ती शर्मानं जिओ हॉट स्टारला दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या हातावरील टॅटू अन् मैदानातील कामगिरी यातील खास कनेक्शनवर भाष्य केले होते.

7 / 10

ज्या वेळी संकटात सापडते, त्यावेळी डाव्या हातावरील हनुमानजींच्या टॅटूवकडे पाहते. त्यातून मला ताकद आणि प्रेरणा मिळते, असे ती म्हणाली होती.

8 / 10

फक्त क्रिकेटच्या मैदानातच नव्हे तर आयुष्यातील चढ उताराच्या काळात बजरंगबलीची भक्ती कामी येते, असेही दीप्ती शर्माने सांगितले होते.

9 / 10

भारतीय महिला संघातील फिट अँण्ड क्रिकेटरनं पहिल्याच सामन्यात यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत. ही गोष्ट तिच्यासह टीम इंडियासाठी आगामी सामन्यात जमेची बाजू ठरेल.

10 / 10

टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय क्रिकेट संघ