कसोटीतील एका डावात सर्वाथिक चेंडू खेळणारे ६ भारतीय फलंदाज? इथं पुजाराचा लागतो पहिला नंबर

असा पराक्रम करणारा पुजारा पहिला अन् एमेव भारतीय

कसोटी क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक चेंडूचा सामना करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत चेतेश्वर पुजारा अव्वलस्थानावर आहे.

पुजारानं १६ मार्च २०१७ रोजी रांची कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६६८ मिनिटांत २०२ धावांची खेळी करताना ५२५ चेंडूचा सामना केला होता.

कसोटीतील एका डावात ५०० पेक्षा अधिक चेंडू खेळणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय खेळाडू आहे.

'मिस्टर डिपेंडेबल' राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. द्रविडनं २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी कसोटी सामन्यात ७४० मिनिटे मैदानात उभे राहून ४९५ चेंडूचा सामना करताना २७० धावांची खेळी केली होती. या खेळी द्रविडनं ३४ चौकार अन् एक षटकार मारला होता.

भारताचे माजी कसोटीपटून नवजोतसिंग सिद्धू या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. १९९७ मध्ये सिद्ध पाजींनी पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत द्विशतक झळकावले होते. ६७३ मिनिटे बॅटिंग करताना त्यांनी ४९१ चेंडूचा सामना करताना १९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २०१ धावा केल्या होत्या.

भारताचे माजी कोच रवी शास्त्रींचाही या खास यादीत समावेश आहे. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत शास्त्रींनी ४७७ चेंडूचा सामना करताना १७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २०६ धावांची खेळी केली होती. या डावात त्यांनी ४७७ मिनिटे बॅटिंग केल्याचा रेकॉर्ड आहे.

१९८१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यात लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी ७०८ मिनिटे बॅटिंग करताना ४७२ चेंडूत १७२ धावांची खेळी केली होती. यात त्यांनी १९ चौकार मारले होते.

२००२ मध्ये राहुल द्रविडनं ओव्हलच्या मैदानात ६२९ मिनिटे मैदानात तग धरत ४६८ चेंडूत २८ चौकाराच्या मदतीने २१७ धावांची खेळी केली होती.