हिटमॅन रोहित अन् किंग कोहलीचा सुपरहिट शो! सचिन-द्रविडच्या खास विक्रमाशी बरोबरी

आता फक्त एक मॅच अन् टीम इंडियाकडून ही जोडी ठरेल नंबर वन!

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुपरहिट शोसह रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीनं ऑस्ट्रेलियातील मैदानातील शेवटचा सामना अविस्मरणीय केला.

'रो-को'चा ऑस्ट्रेलियन मैदानातील 'फायनल शो' हा चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. दोघांनी या सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित केले. यात या जोडीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या खास विक्रमाशी बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली सिडनीच्या मैदानात ३९१ व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळताना दिसली. यासह दोघांनी सचिन-द्रविडची बरोबरी केली.

इथं एक नजर टाकुयात रोहित-विराटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या भारतीय जोड्यांवर..

विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि 'द वॉल' राहुल द्रविड या दोघांनी भारतीय संघाकडून ३९१ सामने एकत्र खेळले आहेत. आणखी एक वनडे सामना खेळताच रोहित-विराट जोडी त्यांच्या पुढे निघून जाईल.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या दोघांनी ३६९ आंतरारष्ट्रीय सामने एकत्र खेळल्याचा रेकॉर्ड आहे.

सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे ही जोडी भारतीय संघाकडून ३६७ आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळल्याचा रेकॉर्ड आहे.