Join us  

PHOTOS : भारतीय खेळाडूची नवी 'इनिंग'! टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजानं गुपचूप उरकलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 12:53 PM

Open in App
1 / 9

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, ज्यामध्ये विजय मिळवून भारताने विजयी सलामी दिली.

2 / 9

भारताने १ चेंडू आणि २ गडी राखून पहिला सामना आपल्या नावावर केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना खूपच रोमांचक होता.

3 / 9

एकिकडे भारतीय संघ मायदेशात ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे, तर दुसरीकडे संघाचा स्टार गोलंदाज विवाहबंधनात अडकला. भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने लग्न केले असून त्याची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने शेअर केली आहे.

4 / 9

नवदीप सैनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच खास कॅप्शनही लिहिले आहे.

5 / 9

'अस्थाना, तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस हा प्रेमाने भरलेला दिवस आहे. आज आम्ही कायमचे एकमेकांचे झालो आहोत. आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत', असे सैनीने लिहले.

6 / 9

नवदीपने स्वाती अस्थानासोबत सातफेरे घेतले. स्वातीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण रिपोर्ट्सनुसार, स्वाती एक फॅशन, ट्रॅव्हलर आणि लाइफस्टाइल ब्लॉगर आहे. तिचे यूट्यूब चॅनेल देखील आहे.

7 / 9

स्वातीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास ८० हजार फॉलोअर्स आहेत.

8 / 9

नवदीप सैनी मागील बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. सैनीने भारतासाठी २ कसोटी, ८ वन डे आणि ११ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

9 / 9

नवदीपने ३ ऑगस्ट २०१९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली अर्थात या सामन्यातून त्याने पदार्पण केले.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघलग्नसेलिब्रिटी