भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.
धनश्री ही एक सुपर डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. तसेच ती एक ग्लॅमरस मॉडेल म्हणून हळूहळू नावलौकिक मिळवते आहे.
सुरुवातीला युजवेंद्र चहलबरोबर प्रत्येक दौऱ्याला जाणाऱ्या धनश्रीने हल्ली मात्र आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलेले आहे.
धनश्री सातत्याने आपल्या विविध प्रकारच्या मॉडेलिंग अन् डान्सिंग असाइनमेंट्सबाबत चाहत्यांशी सोशल मीडियातून संवाद साधते.
सध्या तिने केलेल्या एका ताज्या फोटोशूटमध्ये ती भलतीच हॉट आणि प्रचंड ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.
धनश्रीने ताज्या फोटोशूटमध्ये पांढरा क्रॉप टॉप, निळी डेनिम अन् क्रॉप टॉपवर एक चेक्सचा शर्ट घातला आहे.
धनश्रीने एकाच जागेवर उभं राहून हे पण वेगवेगळ्या मादक पोज देऊन हे फोटोशूट करून घेतलं आहे.
फोटोपोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, तिच्यात एक गुपित लपलंय, ते म्हणजे ती मिर्चीसारखी हॉट अन् बोल्ड आहे.