युवराज सिंगची पत्नी हेजल कीच आज 36 वर्षांची झाली आहे. 28 फेब्रुवारी 2023 या दिवशी ती तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
भारतीय क्रिकेटर युवराज सिंगची पत्नी हेजल कीचच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या आलिशान घराची एक झलक पाहणार आहोत.
हेजल कीचचे घर एखाद्या महालापेक्षा कमी नाही. सिक्सर किंग युवराज सिंगची पत्नी मूळची इंग्लंडमधील आहे.
हेजल कीचच्या संपूर्ण घराला लाकडी फ्लोअरिंग आहे आणि घराला पारदर्शक पडद्यांसह आलिशान टच देण्यात आला आहे.
हेजल कीचच्या घरात खेळण्यासाठी थिएटरपासून जिम आणि पूल टेबल यांची सुविधा आहेत.
युवराज सिंगचे संपूर्ण कुटुंब या आलिशान घरात राहते. भारतीय संघाचा प्रमुख चेहरा राहिलेल्या युवराजची प्रेमकहाणी देखील फार गंमतीशीर आहे.
कुटुंबातील सदस्यांसोबत किमती वेळ घालवताना हेजल कीच घरातील आतील फोटो शेअर करते. हेजल तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे तिचे खास नाते असल्याचेही यातून दाखवते.
हेजल कीचच्या या आलिशान आणि सुंदर घराची किंमत जवळपास 64 कोटी आहे.
हा बंगला कितीही महाग असला तरी हे आलिशान घर बनवण्यासाठी हेजल कीच आणि तिच्या सासूबाईंनी खूप मेहनत घेतली आहे.