बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारताचा युवा स्फोटक सलामीवीर यशस्वी जैस्वाल फिल्डबाहेरील प्रेमाच्या खेळामुळे चर्चेत आला आहे.
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी हा युवा क्रिकेटर चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान त्याचा विमानतळावरील एक व्हिडिओ चर्चेत आलाय. ज्यात तो फॉरेनवाली कथित गर्लफ्रेंड मॅडीसोबत स्पॉट झाल्याचे दिसते.
यशस्वी जैस्वाल याच्या कथित गर्लफ्रेंडच नाव मॅडी हेमिल्टन असं आहे. सोशल मीडियावर या जोडीची चांगलीच चर्चा रंगताना दिसते.
मॅडी हॅमिल्टनसोबतची वाढत्या जवळकीमुळे या दोघांच्यातील प्रेमाच्या खेळाची चर्चा रंगत असली तरी युवा क्रिकेटरनं अद्याप नात्यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही.
ही दोघे जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
मॅडी हॅमिल्टन ही मूळची ब्रिटनची आहे. ती सध्या शिक्षण घेत आहे. पण ती नेमकी काय शिकते ही गोष्ट गुलदस्त्यातच आहे.
मॅडीच्या सोशल मीडियावरील काही फोटोंमध्ये तिचा बोल्ड अन् बिधास्त अंदाजही पाहायला मिळतो.
भारताच्या मॅचेसवेळी सातत्याने ती यशस्वी जयस्वालला चीअर करताना दिसून येते. एवढेच नाही तर यशस्वी जस्वाल हा तिच्या फॅमिलीसोबतही क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसला आहे.