भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षाच्या अखेरीस पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. पंत सध्या विश्रांती घेत असून लवकरच क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल असे अपेक्षित आहे. अशातच पंतच्या घरी सध्या लगीनघाई असल्याचे दिसते.
कारण रिषभ पंतची बहीण साक्षी पंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. साक्षीचा साखरपुडा झाला असून त्याची झलक रिषभ आणि खुद्द साक्षीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
पंतने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचा त्याच्या आईसोबतचा फोटो चाहत्यांना भुरळ घालणारा आहे.
पंतची बहीण साक्षीने तिचा भावी पती अंकित चौधरीसोबत साखरपुड्यातील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसते.
फोटोंना कॅप्शन देत साक्षीने लिहिले की, हा आमच्या प्रेमकथेचा पुढचा अध्याय आहे. साक्षी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध असून रिषभपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
रिषभ पंतच्या कुटुंबात आता एका नव्या सदस्याचा समावेश झाला आहे. रिषभ पंतच्या दाजीचे नाव अंकित चौधरी आहे. अंकित चौधरी आणि साक्षी पंत जवळपास ९ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनीही सातफेरे घेण्याचा निर्णय घेतला.
अंकित चौधरी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असतो. तो एलिट आयटीयू नावाच्या कंपनीच्या संचालक मंडळावर आहे. ही कंपनी शिक्षण आणि पर्यावरणासाठी दीर्घकाळ काम करत आहे.
२०२१ मध्ये अंकित चौधरी या कंपनीत संचालक मंडळ म्हणून रुजू झाला.
साक्षी पंतने देखील आपल्या भावी पतीसोबत सुंदर फोटो शेअर केले आहेत.
बहीण साक्षी पंतचा फोटो शेअर करताना रिषभने लिहिले, 'खूप खूप अभिनंदन.' या फोटोमध्ये साक्षीचा होणारा नवरा अंकित व्यतिरिक्त रिषभ पंतची आई देखील दिसत आहे.