Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पांड्याचा फिल्मी स्टाईल साखरपुडा; गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 09:05 IST

Open in App
1 / 5

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा प्रेमाच्या मैदानात त्रिफळा उडाला असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिकने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली आहे. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे.

2 / 5

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी दुबईमध्ये साखरपुडा केला. त्यावेळी त्यांचे काही निकटवर्तीय सोबत होते. त्यानंतर हार्दिकने नताशा स्टेंकोविकसोबतची तीन छायाचित्रे आणि एक व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यातील एका फोटोमध्ये नताशा साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे.

3 / 5

सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या नच बलिये या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड एल. गोनीसोबत सहभाग घेतला होता.

4 / 5

, हार्दिकने नववर्षाचे स्वागत गर्लफ्रेंड नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत केले होते. तसेच तिच्यासोबतचे एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याने त्याखाली एक मजेशीर कमेंट्सही केली होती. ''नव्या वर्षाची सुरुवात मी माझ्या फायरवर्क (फटाका)सोबत करत आहे.'' असे त्या कमेंट्समध्ये त्याने म्हटले होते.

5 / 5

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ