Join us
Daily Top 2Weekly Top 5

नताशा-हार्दिकला पुत्ररत्न! शेअर केला PHOTO; कोहलीनं दिली अशी 'रिअ‍ॅक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 20:49 IST

Open in App
1 / 11

टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंड्याच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्याची पत्नी नताशा स्टानकोविकने मुलाला जन्म दिला आहे. हार्दिक पंड्याने स्वतःच यासंदर्भात इंस्टाग्राम वरून माहिती दिली आहे.

2 / 11

हार्दिक पंड्याने यासंदर्भात माहिती देताना आणि आनंद व्यक्त करताना लिहिले आहे, 'We are blessed with our baby boy'

3 / 11

हार्दिक पंड्याला मुलगा झाल्याची माहिती सोशल मिडियावर पसरल्यानंतर, त्याला शुभेच्छा येणे सुरू झाले आहे. पांड्याचे अनेक फॅन्स आणि टीम इंडियातील सहकारी, पांड्याला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

4 / 11

हार्दिक पंड्याला मुलगा झाल्याचे समजल्यानतंर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही हार्दिक पंड्या आणि नताशाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'आपल्या दोघांनाही शुभेच्छा,' असे विराट कोहलीने इंस्टाग्रामवर लिहिले आहे. एवढेच नाही, तर तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरनेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 11

टीम इंडियाचे खेळाडू आणि हार्दिक पंड्याचा मित्र, श्रेयस अय्यरनेही हार्दिक आणि नताशाला इमोजीसह शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय क्रुणाल पांड्यानेही या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 11

याशिवाय क्रिकेट आणि बॉलीवुड जगतातील बऱ्याच स्टार्सनी या जोडीला आई-बाबा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

7 / 11

हार्दिक पंड्याचा भाऊ क्रुणाल पंड्याची पत्नी पंखुडी शर्मा हिनेही हार्दिक पांड्या आणि नताशाला हार्टच्या इमोजीच्या सहाय्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

8 / 11

हार्दिक पांड्याने याच वर्षाच्या सुरुवातीला, अॅक्ट्रेस नताशा स्टानकोविकसोबत अचानकपणे साखरपुडाकरून चाहत्यांना धक्का दिला होता.

9 / 11

मुलगा झाल्याची माहिती इंस्टाग्रामवर टाकून हार्दिक पंड्याने अगदी त्याच अंदाजात चाहत्यांना, आणखी एक सरप्राईज दिलं आहे.

10 / 11

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टानकोविकचा या फोटोत पारंपारिक पेहरावात दिसून आले होते. एवढेच नाही, तर या दोघांच्याही गळ्यात हार दिसत होता. यावर लोकांचे म्हणणे होते, की या दोघांनीही लॉकडाउनमध्येच लग्न उरकले.

11 / 11

हार्दिक पांड्या आणि नताशा.

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रुणाल पांड्याविराट कोहलीभारत