Join us  

Team India: नववर्षात टीम इंडियाचे 2 खेळाडू चढणार 'बोहल्यावर', केएल राहुलशिवाय अष्टपैलू खेळाडूही घेणार सात फेरे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 1:24 PM

Open in App
1 / 12

भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ मायदेशात 18 जानेवारीपासून न्यूझीलंडविरूद्ध वन डे आणि ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतून संघाचे 2 खेळाडू लोकेश राहुल आणि अक्षर पटेल यांनी माघार घेतली आहे.

2 / 12

बीसीसीआयने आगामी मालिकेसाठी संघ जाहीर करताना याबाबत माहिती दिली. कौटुंबिक कारणांमुळे अक्षर आणि राहुल हे आगामी मालिकेत नसणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले. खरं तर राहुल आणि अथिया शेट्टी 23 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

3 / 12

केवळ राहुलच नाही तर आणखी एक भारतीय अष्टपैलू खेळाडूही आपल्या सात जन्मांच्या गाठी बांधणार आहे. हा अष्टपैलू खेळाडू कौटुंबिक कारणांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही टीम इंडियाचा भाग असणार नाही. बीसीसीआयने याला दुजोरा दिला आहे. तेव्हापासून या खेळाडूच्या लग्नाच्या चर्चेला वेग आला आहे.

4 / 12

लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या बातम्या मागील एक महिन्यापासून समोर येत आहेत. अशातच राहुलशिवाय आणखी एका भारतीय खेळाडूच्या लग्नाची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षर पटेल लवकरच त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत लग्न करणार आहे.

5 / 12

गुजराती मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षर पटेल त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार आहे. 26 जानेवारी रोजी वडोदरा येथील जेड गार्डनमध्ये लग्नाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

6 / 12

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षरच्या लग्नाचा कार्यक्रम चार दिवसांचा आहे. यामध्ये संगीत समारंभ, हळदी कार्यक्रम आणि विवाहसोहळा यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 किंवा 27 जानेवारीला अक्षरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.

7 / 12

अक्षर-मेहा यांची वर्षभरापूर्वी एंगेजमेंट झाली होती. काही वर्षांपूर्वी नडियाद येथे एका स्पर्धेदरम्यान दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली होती. यानंतर अक्षरने मेहाला तिच्या वाढदिवसाला प्रपोज केले होते. यानंतर त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले आहे.

8 / 12

अक्षर पटेलच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे कारण, बीसीसीआयने न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी संघ जाहीर करताना अक्षर पटेल आणि लोकेश राहुल कौटुंबिक कारणांमुळे आगामी मालिकेसाठी उपलब्ध नसणार असल्याचे सांगितले होते.

9 / 12

अक्षर पटेल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही त्याने चेंडू आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या 3 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 31*, 65 आणि 21* अशा धावा केल्या होत्या.

10 / 12

अक्षर पटेल बऱ्याच दिवसांपासून मेहाला डेट करत आहे. मागील वर्षी त्याच्या वाढदिवशी (20 जानेवारी) त्याने मेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्याने स्वत: याबाबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना माहिती दिली होती.

11 / 12

अक्षर पटेलची होणारी पत्नी मेहा ही पेशाने आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ आहे. अक्षरच्या डाएट आणि फिटनेसची ती पूर्ण काळजी घेते.

12 / 12

मेहाच्या हातावर एक टॅटू आहे, ज्यामध्ये 'AKSH' असे लिहिले आहे. ही भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या नावाची सुरुवातीची अक्षरे आहेत. आयपीएलदरम्यानही मेहा अनेकवेळा स्टेडियममध्ये अक्षरला प्रोत्साहन देताना दिसली आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडलोकेश राहुलअथिया शेट्टी अक्षर पटेललग्न
Open in App