Join us

Photo : भारतीय गोलंदाजाची पडली विकेट; अडकला लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 13:28 IST

Open in App
1 / 10

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रणजी करंडक स्पर्धेतील केरळ संघाचा जलदगती गोलंदाज संदीप वॉरियर्स विवाहबंधनात अडकला. कोलकाता नाईट रायडर्सने लग्नाचे फोटो शेअर करताना संदीपला शुभेच्छा दिल्या. संदीपने स्केटिंगपटू आर्थी कस्तूरीराज हिच्याशी लग्न केले आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 10

संदीप वॉरियर्सने भारत A संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि गेल्याच महिन्यात वेस्ट इंडिज A विरुद्धच्या सामन्यात त्याने दोन डावांत मिळून पाच विकेट्स घेतल्या होत्या. तत्पूर्वी, त्याने श्रीलंका A विरुद्धच्या मालिकेतही चांगली कामगिरी केली होती.

3 / 10

2019 च्या आयपीएलमध्ये त्याला तीन सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याने 7.08 च्या सरासरीनं 2 विकेट्स घेतल्या.

4 / 10

संदीपने रणजी करंडक स्पर्धेत 2018-19च्या मोसमात 10 सामन्यांत 44 विकेट्स घेतल्या, तर विजय हजारे चषक स्पर्धेत 6 सामन्यांत 12 फलंदाज बाद केले.

5 / 10

सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत संदीपच्या नावावर हॅटट्रिक आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्यानं आयपीएलमध्ये एन्ट्री घेतली. कमलेश नागरकोटी दुखापतग्रस्त झाल्यानंतर कोलकाता संघाने संदीपला ताफ्यात दाखल करून घेतले.

6 / 10

2018च्या विजय हजारे चषक स्पर्धेदरम्यान त्याच्यावर तीन सामन्यांच्या बंदीची कारवाई झाली होती. केरळचा कर्णधार सचिन बेबीला विरोध करणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये संदीपचाही समावेश होता.

7 / 10

संदीपची पत्नी आर्थी ही स्केटिंगपटू आहे. ती M.B.B.S विद्यार्थी असून वयाच्या सातव्या वर्षी तिनं स्केटिंग खेळायला सुरुवात केली.

8 / 10

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने आतापर्यंत 130 पदकं जिंकली आहेत. त्यात 111 सुवर्ण, 11 रौप्य आणि 8 कांस्यपदकांचा समावेश आहे.

9 / 10

युरोपियन चषक इनलाईन स्पिड स्केटिंग स्पर्धेत 500 मीटर प्रकारात दुसरे स्थान पटकावणारी पहिली भारतीय आहे.

10 / 10

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सआयपीएलभारतीय क्रिकेट संघ