Rohit Sharma IND vs ENG 5th Test: भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्ध पाचवी कसोटी १ ते ५ जुलैदरम्यान खेळणार आहे. गेल्या वर्षी भारताने विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. त्यापैकी एक सामना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता.
भारतीय संघाचे नेृतत्व रोहित शर्माकडे आहे पण तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्या संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
याच दरम्यान, इंग्लंडच्या एका दिग्गज खेळाडूने भारतीय संघाला इशारा दिला आहे. भारताचं इंग्लंडशी कसोटी सामना खेळण्याचं टायमिंग चुकीचं असल्याचे त्याने म्हटलं आहे.
'इंग्लंडने नुकतीच न्यूझीलंड विरूद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली आहे. इंग्लंड सध्या दमदार फॉर्मात आहे. भारताविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाचं पारडं जड आहे.'
'भारतीय संघाला इंग्लंडला आल्यापासून केवळ एकच सराव सामना खेळायला मिळाला. त्यामुळे भारतीय संघाची तयारी अर्धवट राहिले आहे. अशा वेळी इंग्लंडसाठी हा फायद्याचा काळ आहे.'