Join us  

India vs England 4th test Live : उमेश यादवला मिळाली २१९ दिवसांनंतर संधी, विक्रमी कामगिरीनं पटकावलं कपिल देव, झहीर यांच्या स्पेशल क्लबमध्ये स्थान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 5:53 PM

Open in App
1 / 5

इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेअरस्टो व ऑली पोप यांनी आक्रमक खेळ करताना डाव सावरला. इंग्लंडनं दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ५ बाद १३९ धावा केल्या आहे आणि ते ५२ धावांनी अजूनही पिछाडीवर आहेत. पहिल्या सत्रात दोन विकेट्स घेत उमेश यादवनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

2 / 5

क्रेग ओव्हर्टनची विकेट घेत उमेशनं कसोटी क्रिकेटमधील बळींचे दीडशतक पूर्ण केले. (Umesh Yadav 150th Test Wicket). त्यानं ४९व्या सामन्यात हा पराक्रम करताना झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी केली.

3 / 5

भारताकडून कसोटीत १५० विकेट्स घेणारा उमेश हा १६ वा गोलंदाज ठरला आहे. त्यानं २६ डिसेंबर २०२०मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटची कसोटी खेळली होती आणि त्यानंतर २१९ दिवसांनंतर तो ओव्हल येथे मैदानावर उतरला.

4 / 5

भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जलदगती गोलंदाजांमध्ये उमेशनं सहावे स्थान पटकावले. कपिल देव १३१ कसोटींत ४३४ विकेट्ससह आघाडीवर आहेत. त्यानंतर इशांत शर्मा ३११ विकेट्, झहीर खान ३११ विकेट्, जवागल श्रीनाथ २३६ विकेट्स आणि मोहम्मद शमी १९५ विकेट्स यांचा क्रमांक लागतो.

5 / 5

कपिल देव यांनी ३९ कसोटींत १५० विकेट्स घेतल्या होत्या, तर जवागल श्रीनाथ व शमी यांना अनुक्रमे ४० व ४२ व्या कसोटीत हे यश मिळाले होते. झहीरला १५० कसोटी विकेट्स घेण्यासाठी ४९ सामने खेळावे लागले होते आणि उमेशनं या विक्रमाशी बरोबरी केली.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघकपिल देवझहीर खान
Open in App