Join us  

India vs Australia : युजवेंद्र चहलच्या नावावर नकोशी कामगिरी; पहिल्या डावात मोडले गेले पाच मोठे विक्रम

By स्वदेश घाणेकर | Published: November 27, 2020 4:49 PM

Open in App
1 / 6

India vs Australia : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. कर्णधार अॅरोन फिंच ( ११४) आणि स्टीव्ह स्मिथ ( १०५) यांच्या शतकी खेळीला डेव्हिड वॉर्नर ( ६९) आणि ग्लेन मॅक्सवेल ( १९ चेंडूंत ४५ धावा) यांच्या फटकेबाजीची साथ मिळाली. ऑस्ट्रेलियानं ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान आजच्या सामन्यातील पहिल्या डावात पाच मोठे विक्रम मोडले गेले.

2 / 6

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचनं वन डे क्रिकेटमध्ये ५००० धावांचा पल्ला पार केला. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद पाच हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये फिंचनं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यानं १२६ डावांमध्ये ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या दिवंगत डिन जोन्स यांचा ( १२८ डाव) विक्रम फिंचनं मोडला. डेव्हिड वॉर्नर ११५ डावांसह अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला ( १०१ डाव) जगात अव्वल आहे.

3 / 6

फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. फिंच-वॉर्नरची भारताविरुद्धची ही चौथी दीडशतकी + भागीदारी ठरली. एकाच संघाकडून वन डेत सर्वाधिक १५०+ धावांची भागीदारी करणारी ही यशस्वी जोडी ठरली. विराट कोहली व रोहित शर्मा ( ३ वि. श्रीलंका) आणि रोहित शर्मा व शिखर धवन ( ३ वि. ऑस्ट्रेलिया) यांचा विक्रम आज ऑसी जोडीनं मोडला.

4 / 6

स्टीव्हन स्मिथनं ६२ चेंडूंत शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाकडून हे तिसरे जलद शतक ठरले. यापूर्वी २०१५मध्ये मॅक्सवेलनं श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत, तर जेम्स फॉल्कनरनं २०१३मध्ये भारताविरुद्ध ५७ चेंडूंत शतक पूर्ण केलं होतं. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला.

5 / 6

युजवेंद्र चहलनं १० षटकांत १ विकेट घेताना ८९ धावा दिल्या. भारतीय गोलंदाजाची वन डे क्रिकेटमधील सर्वात लाजीरवाणी कामगिरी आहे. यापूर्वीही २०१९मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध ८८ धावा दिल्या होत्या. चहलनं टाकलेल्या ४३ व्या षटकांत ग्लेन मॅक्सवेलनं २१ धावा चोपल्या.

6 / 6

ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या. भारताविरुद्धची ही ऑसींची सर्वोत्तम कामगिरी आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअ‍ॅरॉन फिंचडेव्हिड वॉर्नरस्टीव्हन स्मिथयुजवेंद्र चहलआॅस्ट्रेलिया