Join us

T20 World Cup संघ जाहीर करण्यासाठी फक्त १५ दिवस उरले; भारताचे १३ खेळाडू ठरले, २ जागांसाठी ५ जणं भिडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 16:14 IST

Open in App
1 / 9

Indian T20 World Cup Squad : पुढील १५ दिवस हे भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. १५ सप्टेंबर ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख आहे आणि BCCI व निवड समितीला या १५ दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणारा संघ निवडायचा आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा हे आशिया २०२२ स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे मुल्यांकन करणार आहे. आनंदाची बातमी अशी आहे की १५ पैकी १३ खेळाडूंची निवड ९९ टक्के निश्चित झाली आहे आणि उर्वरित २ जागांसाठी ५ खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

2 / 9

पण, जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल ही भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतून बुमराह व पटेल कमबॅक करतीय, याचीही खात्री निवड समितीला नाही. अशात या दोघांनी माघार घेतल्यास मोहम्मद शमीचे स्थान पक्के मानले जात आहे. मात्र, दोन जागांसाठी फिरकीपटू, फलंदाज व जलदगती अशी चुरस आहे.

3 / 9

''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला अजून दोन- अडीच महिने आहेत. त्याआधी आशिया चषक आणि ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आहेत. आातापर्यंत ८०- ९० टक्क्यांपेक्षा अधिक संघ सेट आहे. परिस्थितीनुसार ३-४ बदल पाहायला मिळू शकतील,''असे रोहितने नुकतेच म्हटले होते. आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाचा विचार केला, तर इशान किशन, श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. पण, यापैकी १ राखीव खेळाडू म्हणून संघासोबत जाऊ शकतो.

4 / 9

रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाने विजयाची मालिका कायम राखली आहे. रोहितने १७ सामन्यांत ४६१ धावा केल्या आहेत. लोकेश राहुल ( KL Rahul ) याच्यावर निवड समितीने विश्वास दाखवताना उप कर्णधारपद दिले आहे. ऑस्ट्रेलियात तो रोहितसह ओपनिंगला येणार आहे. पण, दुखापतीमुळे यंदाच्या वर्षात तो फार कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. त्याने ३ सामन्यांत ८० धावा केल्या आहेत.

5 / 9

फॉर्माशी झगडत असला तरी विराट कोहली हा टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. त्यामुळे टीका करणारे कितीही ओरडत असले तरी तो हा वर्ल्ड कप खेळणार ने पक्के आहे. त्याच्या तिसऱ्या क्रमांकासाठी दीपक हुडा व इशान किशन हे तगडे पर्याय निवड समितीसमोर आहेत. त्यामुळेच आशिया चषक ही विराटला त्याचा फॉर्म पुन्हा मिळण्याची संधी आहे. विराटने मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर ५ सामन्यांत ११६ धावा केल्या आहेत.

6 / 9

सूर्यकुमार यादव हा मधल्या फळीत टीम इंडियाला सक्षम फलंदाज मिळाला आहे. भारताचा Mr 360 अशी सूर्याने स्वतःची ओळख बनवली आहे. त्याने १६ सामन्यांत १ शतक व ३ अर्धशतकांसह ५०९ धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले आहे, ते पाहता त्याला नकार मिळणे शक्यच नाही. त्याने १४ सामन्यांत ३१४ धावा केल्या व ११ विकेट्सही घेतल्या आहेत.

7 / 9

रवींद्र जडेजा ( ८ सामने २०१ धावा व ४ विकेट्स), भुवनेश्वर कुमार ( २१ सामने २७ विकेट्स), युजवेंद्र चहल ( १४ सामने १६ विेकेट्स) यांचेही स्थान पक्के आहे. दिनेश कार्तिक हा सप्राईज पॅकेज आहे. २०१९नंतर संघाबाहेर असलेल्या कार्तिकने कामगिरीच्या जोरावर पुन्हा एका भारतीय निवड समितीचा त्याचा विचार करण्यास भाग पडले. त्याने १६ सामन्यंत १९३ धावा केल्या आहेत.

8 / 9

रिषभ पंत, दीपह हुडा ( ९ सामने २७४ धावा), अर्षदीप सिंग ( ७ सामने ११ विकेट्स) व दीपक चहर ( ६ सामने ६ विकेट्स) हेही १३ खेळाडूंमध्ये पक्के आहेत. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांची दुखापत टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. अशात मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई व आवेश खान हे शर्यतीत आहेत.

9 / 9

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माबीसीसीआयजसप्रित बुमराह
Open in App