टीम इंडियातील स्टार फिरकीपटू कुलदीप यादव आणि त्याची पत्नी वंशिका चड्ढा यांनी आपल्या मित्र परिवारासाठी लखनौमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती.
लखनौच्या 'द सेंट्रम; हॉटेलमधील अलिशान रिसेप्शन पार्टीत राजकिय मंडळींसह टीम इंडियातील स्टार क्रिकेटर्संनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांना पाहताच कुलदीप यादव त्यांच्या पाया पडल्याचे दिसून आले. हा क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही कुलदीप आणि वंशिकाला आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन काही खास फोटो शेअर केले आहेत.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही या कार्यक्रमात हजेरी लावली होती. नव्या वर वधूला शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या क्रिकेटर्सचा रिसेप्शन पार्टीत रॉयल अंदाज पाहायला मिळाला.
भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन पत्नी सोफीसह या वेडिंग रिसेप्शन पार्टीत अगदी रॉयल अंदाजात पोहचल्याचे पाहायला मिळाले.
भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि रिवाबा जडेजा या जोडीनंही आपल्या आकर्षक लूकनं मैफिल लुटली.
टीम इंडियाचा स्टार विकेट किपर बॅटर आणि लखनौचा कर्णधार रिषभ पंतही एकदम कडक लूकमध्ये रिसेप्शन पार्टीत स्पॉट झाला.
टीम इंडिया आणि राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल यानेही कुलदीप-वंशिका यांच्या रिसेप्शन पार्टीत परफेक्ट लूकसह स्टायलिश अंदाज दाखवून दिला.