भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना भारताने जिंकला.
या विजयासह भारतीय संघाने तब्बल 84 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे.
भारताने हा भीमपराक्रम पहिल्यांदाच केल्याचे पाहायला मिळत असल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला तब्बल दोनदा फॉलोऑन देऊन मोठे विजय मिळवलेले नाहीत. त्याचबरोबर आतापर्यंत एका मालिकेत दोन किंवा त्यांच्यापेक्षा जास्तवेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याची घटना तब्बल 84 वर्षांनी घडली आहे.
या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक इतिहास रचला आहे.
आपल्याच मातीमध्ये भारताच्या कर्णधाराला विराटसारखी कामगिरी करता आलेली नाही.
कोहलीने आपल्याच मैदानात तब्बल तीनवेळा प्रतिस्पर्ध्यांना व्हाइट वॉश देण्याची किमया साधली आहे.
आतापर्यंत एकाही भारताच्या कर्णधाराला आपल्याच मैदानात तीन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन करता आलेले नाही.
यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दिनने दोन वेळा दोन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन केले होते.