Join us  

दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 3:16 PM

Open in App
1 / 7

भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना दुस-या एकदिवसीय सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ५० धावांनी पराभव करुन ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली

2 / 7

कोहलीने अजिंक्य रहाणेसह (५५) दुसºया गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाज छाप पाडण्यात अपयशी ठरले. केदार जाधव (२४), हार्दिक पांड्या (२०) व भुवनेश्वर (२०) यांनी थोडाफार प्रतिकार केला

3 / 7

विराट कोहली ३१ व्या एकदिवसीय शतकापासून केवळ आठ धावांनी वंचित राहिला. त्याने १०७ चेंडूत आठ चौकारांसह ९२ धावा ठोकल्या. भारताचा डाव ५० षटकांत सर्वबाद २५२ असा मर्यादित राहिला.

4 / 7

हिल्टन कार्टराइट (१) व डेव्हिड वॉर्नर (१) स्वस्तात परतल्याने कांगारुंची २ बाद ९ धावा अशी अवस्था झाली. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ (५९) व ट्राविस हेड (३९) यांनी डावा सावरला

5 / 7

कुलदीपने ३३व्या षटकात वेड, एगर व कमिन्स यांना बाद करत निर्णायक हॅट्ट्रीक घेऊन कांगारुंची ८ बाद १४८ अशी अवस्था केली. हॅट्ट्रीक घेत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय म्हणून कुलदीपने छाप पाडली. विशेष म्हणजे गेल्या २७ वर्षांत एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय ठरला.

6 / 7

एका बाजूने टिकून राहिलेल्या मार्कस स्टोइनिसने ६५ चेंडूत नाबाद ६२ धावा करत संघाच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र, पांड्याने कुल्टर-नाइल आणि भुवीने रिचर्डसनला बाद करुन भारताचा विजय निश्चित केला.

7 / 7

५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेटआॅस्ट्रेलियाविराट कोहली