Rohit Sharma, IND vs WI: पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावांत गारद झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीनंतर भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला ऑल आऊट केले. वेस्ट इंडिजकडून एलिक अथानाजने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले.
भारतासाठी फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. रवींद्र जडेजाने 3 तर अश्विनने 5 फलंदाजांना बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 80 धावा केल्या. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सलामी दिली.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक निर्णय घेतला. डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने एका अशा खेळाडूला संधी दिली ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
रोहितने यष्टिरक्षक म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेला आपला सहकारी इशान किशन याला संघात स्थान दिले. अशा वेळी त्याने उदयोन्मुख खेळाडू श्रीकर भरतला संघाबाहेरचा रस्ता दाखवला.
केएस भरतने आतापर्यंत भारतासाठी 5 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने केवळ 18.42 च्या सरासरीने 129 धावा केल्या आहेत. ईशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली तर केएस भरतला संघात पुनरागमन करणे कठीण होऊन बसणार आहे.