T20 World Cup मध्ये वेस्ट इंडिजनं एकदा दोनदा नव्हे तीन वेळा टीम इंडियाला दिला आहे धक्का; इथं पाहा रेकॉर्ड

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-वेस्ट इंडिज किती वेळा समोर आले? जाणून घ्या दोन्ही संघातील रेकॉर्ड

टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील लढतीला क्वॉर्टर फायनलचं स्वरुप आले आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानात जो संघ जिंकेल, तो सेमीफायलमध्ये एन्ट्री मारेल.

गत चॅम्पियन टीम इंडियाचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा विक्रम तगडा असला तरी वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाने एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा पराभवाचा धक्का दिला आहे.

इथं एक नजर टाकुयात भारत- वेस्ट इंडिज टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील किती वेळा एकमेंकांसमोर आले आहेत. कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड

२००९ मध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना रंगला होता. डेवॉन ब्रावोच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने त्यावेळी भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला होता.

२०१० मध्ये ख्रिस गेलच्या पॉवर शोमुळे वेस्ट इंडिजच्या संघाने टीम इंडियाला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले होते. गेलनं केलेल्या ९८ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं भारताविरुद्ध विजय नोंदवल्याचे पाहायला मिळाले होते.

२०१४ च्या हंगामात भारतीय संघाने वेस्ट इंडिजला मात दिली होती. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावली होती.

२०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने टीने इंडियाला मोठा धक्का दिला होता. विराट कोहलीनं केलेल्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १९२ धावा केल्या होत्या. पण जॉन्सन चार्ल्स यांनी अर्धशतक झळकावले, लेंडल सिमन्स याने नाबाद ८२ धावांची शानदार खेळी केली, तर आंद्रे रसेल याने नाबाद ४३ धावा करत डावाला दमदार शेवट दिला.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धचा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील खराब रेकॉर्ड सुधारून दिमाखात सेमीफायनल गाठण्यासाठी प्रयत्नशील असेल.