वन डे संघात संजू सॅमसन व ऋतुराज परतले आहेत. कसोटी आणि वन डे संघात एक नाव कॉमन दिसतेय आणि ते म्हणजे बिहारचा गोलंदाज मुकेश कुमार ( Mukesh Kumar) याचे... आपल्या मेहनतीने मुकेशने भारतीय संघात स्थान पटकावले आहे आणि त्याचा इथवरचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी त्याची निवड झालेली, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार ), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, मुकेश कुमार
बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचे वडील कोलकात्यात टॅक्सी चालवायचे. मुकेशच्या वडिलांना क्रिकेटचा तिरस्कार होता आणि या खेळात नाव कमावण्यासाठी मुकेशकडे फक्त एक वर्ष होते.
२००८-०९ मध्ये बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात 'प्रतिभा की खोज' नावाचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. इथेच मुकेश कुमारच्या प्रयत्नाची सुरुवात झाली होती. २५-२५ षटकांच्या सामन्यात मुकेश कुमारने सात सामन्यांत ३४ बळी घेतले. एका वर्षानंतर त्याने बीसीसीआयने आयोजित केलेल्या असोसिएट स्पर्धेत बिहार अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले.
स्थानिक गोपालगंज जिल्हा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अमित सिंग याने मुकेश कुमारची प्रतिभा प्रथमच पाहिली होती. तो रोज 30 किलोमीटर सायकलिंग करून क्रिकेट खेळायला यायचा. मुकेशचे गाव गोपालगंजपासून १५ किलोमीटर दूर होते. तो त्याच्या पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खूप धावायचा. सैन्यात भरती होण्यासाठी देखील तो प्रयत्न करत होता. मुकेश कुमार २०१२ मध्ये कोलकाता येथे वडिलांना त्यांच्या टॅक्सी व्यवसायात मदत करण्यासाठी गेला.
कोलकात्यातही मुकेशने वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन दुसऱ्या लीगमध्ये ४००-५०० रुपयांत स्थानिक सामने खेळायला सुरुवात केली. २०१४ मध्ये मुकेश आणखी एका कसोटी सामन्यात सामील झाला, ज्याने त्याचे आयुष्य बदलले. बंगालच्या बुची बाबू स्पर्धेसाठी मुकेश कुमारची निवड झाली तेव्हा त्याच्याकडे क्रिकेट किट देखील नव्हते. तेव्हा मनोज तिवारी यांनी त्याला बॅट, पॅड आणि हातमोजे दिले होते.
२० लाख मुळ किंमत असलेल्या मुकेश कुमारला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ५.५० कोटींत संघात घेतले. मुकेशने ३९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४९, २४ लिस्ट ए क्रिकेटमध्ये २६ आणि ३३ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३२ विकेट्स घेतल्या आहेत.