विंडीजने पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केल्यानंतर क्रेग ब्रेथवेट व पदार्पणवीर किर्म मॅकेंझीने डाव सावरला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ही जोडी सकारात्मक खेळ करताना दिसली, परंतु भारताकडून पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने ( Mukesh Kumar) धक्का दिला.
ब्रेथवेट आणि मॅकेंझी यांनी तिसऱ्या दिवसात संयमी सुरुवात करताना भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहिली. पदार्पणवीर मुकेश कुमारने ही ४६ धावांची भागीदारी तोडताना मॅकेंझीला ( ३२) माघारी पाठवले. विंडीजला ११७ धावांवर दुसरा धक्का बसला आणि पावसाच्या आगमनामुळे खेळ थांबला.
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही यजमान वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. विराट कोहलीचे ( १२१) शतक, रोहित शर्मा ( ८०) , रवींद्र जडेजा ( ६१) , यसश्वी जैस्वाल ( ५७) आणि आर अश्विन ( ५६ ) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४३८ धावा उभ्या केल्या. विंडीजच्या जोमेल वॉरिकन व केमार रोच यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी भारताच्या युवा खेळाडूंसोबत एक तरुणी दिसली.. शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांच्यासोबत गप्पा मारतानाचे तिचा व्हिडीओ व्हायरल झाला. नंतर तिने या खेळाडूंसोबत फोटोही काढले.
त्रिनीदाद अँड टोबॅगोची अॅचे अब्राहमन असे या तरुणीचं नाव आहे आणि ती Miss World 2023 ची विजेती आहे. भारतात होणाऱ्या ७१व्या Miss World pageant स्पर्धेत ती सहभाग घेणार आहे.