टीम इंडियाने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला.
ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तसेच या विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रमांची नोंद केली.
भारतीय संघासाठी हा विजय खूप खास आहे. टी-२०, कसोटी आणि वनडे अशा तिन्ही प्रकारात मिळून भारतीय संघाचा वेस्ट इंडिजविरुद्धचा हा १०० वा विजय आहे. तसेच भारतीय संघाला मायदेशातच हा विजय मिळाला आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत २० पेक्षा अधिक टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये त्याच्या विजयाची सरासरी सर्वाधिक आहे. तर २० पेक्षा अधिक टी-२० सामन्यांमध्ये कप्तानी करणाऱ्या विराट कोहलीच्या विजयाची सरासरी ६६.६६ आहे. तर धोनीची सरासरी ६० टक्के आहे.
सन २००९ ते २०१७ या काळात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ८ टी-२० सामने खेळले गेले होते. त्यापैकी केवळ २ सामन्यांत भारताला विजय मिळाला होता. तर पाच सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला होता. तर २०१८ नंतर दोन्ही संघांत १० सामने खेळवले गेले. त्यातील नऊ सामन्यांत भारताला विजय मिळाला. तर केवळ एका सामन्यात वेस्ट इंडिजला विजय मिळवला.