Join us

Dhanashree Verma Yuzvendra Chahal, IND vs WI 1st ODI: टीम इंडिया जिंकली! युजवेंद्र चहलची बायको धनश्रीने त्याच्यासाठी पोस्ट केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:54 IST

Open in App
1 / 6

IND vs WI 1st ODI, Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भारतीय संघाने कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) वेस्ट इंडिजला ६ गडी राखून पराभूत केलं. युजवेंद्र चहलच्या ४९ धावांत ४ बळींच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा डाव १७८ धावांतच आटोपला.

2 / 6

युजवेंद्र चहलसाठी पहिली वन डे खास ठरली. त्याला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीराचा किताब मिळाला आणि त्याने १०० बळींचा टप्पाही पूर्ण केला. त्यासंबंधीची एक खास पोस्ट त्याची पत्नी धनश्री वर्मा हिने शेअर केली.

3 / 6

धनश्री वर्मा ही सोशल मिडियावर खूपच अँक्टिव्ह असते. गेले काही दिवस कोरोनामुळे ती खूपच आजारी होती. पण आता ती तंदुरूस्त झाली आहे.

4 / 6

चहलच्या १०० बळींच्या सेलिब्रेशनचा एक फोटो धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला. भारताच्या १००० व्या वन डे सामन्यात चहलने १०० वा बळी टिपला. हा योगायोग आनंददायी असल्याचं धनश्री म्हणाली.

5 / 6

धनश्रीने चहलसोबतचा स्वत:चाही एक फोटो पोस्ट केला. 'तू केलेल्या कामगिरीसाठी अभिनंदन! अशीच प्रगती कर आणि देशाचं नाव उंचावत राहा', असा संदेशही धनश्रीने पोस्टच्या कॅप्शनमधून दिला.

6 / 6

धनश्रीच्या त्या पोस्टवर युजवेंद्र चहलनेदेखील 'धन्यवाद बायको' अशी कमेंट करत हार्टचे दोन इमोजी पोस्ट केले. (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयुजवेंद्र चहलभारत
Open in App