Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:11 IST

Open in App
1 / 7

टीम इंडियाने कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत दमदार कमबॅक केले. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकत आपले वर्चस्व गाजवले.

2 / 7

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन बड्या खेळाडूंनी आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला मोठे विजय मिळवून दिले. विराटने दोन शतकेही ठोकली.

3 / 7

रोहित आणि विराट यांच्या दमदार खेळीमुळेच त्यांना ताज्या फलंदाजांच्या क्रमवारीत पहिला आणि दुसरा क्रमांक मिळाला आहे. नव्या खेळाडूंनाही त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.

4 / 7

युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल रोहित शर्मासोबत मुंबईच्या रणजी संघापासून खेळत आलेला आहे. त्यामुळे त्याला रोहितबाबत खूप गोष्टी माहिती असून त्यांचे बॉन्डिंग खूपच चांगले आहे.

5 / 7

तसे असले तरीही रोहित शर्मा मैदानावर जेव्हा एक गोष्ट करतो तेव्हा मात्र यशस्वी आणि इतर नवोदित खेळाडूंना खूपच विचित्र आणि चुकल्याचुकल्यासारखे वाटते असे जैस्वाल म्हणाला.

6 / 7

यशस्वी जैस्वाल म्हणाला, 'रोहित भाई मैदानात जेव्हा आमच्यावर ओरडतो तेव्हा त्यात त्याचे प्रेम असते. तो कायमच चांगल्यासाठी ओरडतो हे आम्हा सगळ्यांना माहिती असते.'

7 / 7

'पण जेव्हा रोहितभाई मैदानात असूनही आमच्यावर ओरडत नाही, तेव्हा आम्हाला खूप विचित्र वाटते. आमच्या मनात असं येत असतं की, आपलं काही चुकलं असेल का?' असे जैस्वाल म्हणाला.

टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५रोहित शर्मायशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघ