Join us  

IND vs SA, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma-लोकेश राहुल जोडी हिट ठरली, बाबर-रिझवानला पुरून उरली; मोठा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 7:58 PM

Open in App
1 / 7

या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा प्रत्येक डाव उलटवून लावताना भारतासाठी धावांचा डोंगर उभा केला. या यशस्वी वाटचालीत रोहित-लोकेशने पाकिस्तानच्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान या हिट ओपनर्सनाही धोबीपछाड दिली. १०व्या षटकात ही भागीदारी तुटली, परंतु त्यांनी १०च्या सरासरीनं डोंगर उभा केला आहे.

2 / 7

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीच बदल केलेला नाही. आफ्रिकेच्या संघात तब्रेझ शम्सीच्या जागी लुंगी एनगिडी मैदानावर उतरला. रोहित शर्माचा आजचा ४०० वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि एवढे ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय आहे.

3 / 7

भारताकडून रोहितनंतर दिनेश कार्तिक ( ३६८), महेंद्रसिंग धोनी ( ३६१), विराट कोहली ( ३५४) व सुरेश रैना ( ३३६) यांचा क्रमांक येतो. लोकेश राहुल व रोहित यांनी भारताच्या डावाची सकारात्मक सुरुवात केली. लोकेशने पहिलाच चेंडू चौकार खेचला, तर रोहितने दुसऱ्या षटकात स्कूप मारून चौकार कमावला. रोहितने आज चौकार मारून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात ५०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय कर्णधाराचा मान पटकावला.

4 / 7

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबर आजम ( ९३९ धावा, २०२१) याच्यानंतर आता रोहितचाच क्रमांक येतो. भारतीय कर्णधारांमध्ये विराट कोहलीने २०१९मध्ये ४६६ धावा केल्या होत्या. लोकेश-रोहित ही जोडी आज आफ्रिकेच्या गोलंदाजांवर भारी पडताना दिसली. रोहित उत्तुंग फटके मारत होता, तर लोकेशची तंत्रशुद्ध फलंदाजी चाहत्यांना खिळवणारी ठरली.

5 / 7

या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५७ धावा चोपल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ५०+ धावांची भागीदारी करण्याचा विक्रम रोहित व लोकेशने आज नावावर केला. या दोघांनी १५ वेळा हा पराक्रम करताना पाकिस्तानच्या बाबर-रिझवान यांचा ( १४) विक्रम मोडला.

6 / 7

7 / 7

१०व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर रोहितने मिडविकेटच्या दिशेने जोरदार फटका मारला, परंतु यावेळेस सीमारेषा पार करण्याआधीच तो त्रिस्तान स्टब्सने टिपला. रोहित ३७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४३ धावांवर बाद झाला अन् भारताला ९६ धावांवर पहिला धक्का बसला. लोकेशने २४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलरोहित शर्माबाबर आजम
Open in App