Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup: पाकिस्तानवरही बांगलादेशसारखी वेळ? हकालपट्टी झाल्यास 'या' संघाला मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:24 IST

Open in App
1 / 8

पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानवर चहुबाजूंनी टीका होत आहे.

2 / 8

पाकिस्तानकडे आशिया चषकाचे यजमानपद असताना भारताचे सामने दुबईत खेळले गेले. तसेच, भारताकडे यजमानपद असल्याने पाकिस्तानचे टी२० वर्ल्डकपचे सामने श्रीलंकेत होणार आहेत.

3 / 8

बांगलादेशने आयसीसीला त्यांच्या संघाचे सामने भारतातून बाहेर हलवण्याची विनंती केली होती, परंतु आयसीसीने नकार दिला. या काळात बांगलादेशला फक्त पाकिस्ताननेच पाठिंबा दिला.

4 / 8

भारतात कुठलाही धोका नाही असा अहवाल दिल्यानंतरही बांगलादेशने ICC चे ऐकले नाही. त्यामुळे बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आणि त्याजागी स्कॉटलंडला संधी मिळाली.

5 / 8

बांगलादेशला स्पर्धेबाहेर केल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला. पाकिस्तानच्या निर्णयावर आयसीसीची तीव्र नाराजी आहे.

6 / 8

आयसीसीकडून पाकिस्तानला समज देण्यात आली आहे. पण तरीदेखील पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास पाकिस्तानची अवस्थाही बांगलादेशसारखी होऊ शकते.

7 / 8

जर आयसीसीने पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना स्पर्धेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला तर मात्र पाकिस्तानच्या जागी बदली संघ म्हणून युगांडा संघाला संधी मिळू शकते.

8 / 8

टी२० मध्ये सध्या समावेश नसलेल्या संघांच्या यादीत युगांडा हा रँकिंगमध्ये सर्वोच्च क्रमांक असलेला संघ आहे. स्कॉटलंडचीही निवड करतानाही याच प्रकारचे निकष लावण्यात आले होते.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026भारत विरुद्ध पाकिस्तानबांगलादेशआयसीसी