भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज आशिया कपचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांकडे दमदार खेळाडू आहेत. जाणून घेऊया, असे १० खेळाडू जे एकहाती सामना फिरवू शकतात.
अभिषेकने खेळलेल्या १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १९३.४९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शाहीन आफ्रिदीशी त्याची लढाई खेळाची दिशा ठरवू शकते.
भारतीय संघाचा 'मिस्टर ३६०' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादववर या सामन्यात मोठी जबाबदारी असेल. मधल्या षटकांमध्ये त्याचा खेळ भारताची सर्वात मोठी ताकद असेल.
हा चायनामन गोलंदाज मधल्या षटकांमध्ये पाकिस्तानी फलंदाजांवर मात करू शकतो. दीर्घ विश्रांतीनंतर संधी मिळाल्यावर यूएईविरुद्ध त्याने आपली छाप सोडत चार विकेट घेतल्या.
बुमराहचे यॉर्कर आणि अचूक गोलंदाजी पाकिस्तानी फलंदाजांना नक्कीच त्रास देईल. बुमराह पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये भल्याभल्यांना घाम फोडू शकतो यात दुमत नाही.
हा अष्टपैलू खेळाडू संघात नवीन उत्साह निर्माण करतो. हार्दिकने पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या अष्टपैलू कामगिरीने आधीही अनेकदा सामन्याचे चित्र पालटून टाकलेले आहे.
हा वेगवान गोलंदाज नवीन चेंडूने भारतासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. त्याचे मुख्य ध्येय अभिषेक आणि गिलसारख्या भारतीय सलामीवीरांना लवकर बाद करणे असेल.
हा पाकिस्तानी सलामीवीर पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. अयुब हा सुरुवातीपासूनच आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो.
ओमानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघाला सावरणारा मोहम्मद हरिस भारताविरूद्धही जलद धावा करू शकतो. तो खेळला तर पाकिस्तानचा स्कोअर वेगाने वाढू शकतो.
अनुभवी फलंदाज आणि संघाचा कर्णधार सलमान आगा फिनिशरची भूमिका बजावू शकतो. तसेच, तो एक उत्तम पार्ट-टाइम स्पिनर देखील आहे, जो झटपट ओव्हर्स टाकू शकतो.
हा चायनामन गोलंदाज आशिया कपमध्ये पाकिस्तानसाठी एक्स-फॅक्टर मानला जात आहे. त्याची फिरकी भारतीय फलंदाजांविरुद्ध खेळाचा मूड बदलू शकते.