IND vs PAK : ...अन् तो ठरला बुमराहला षटकार मारणारा पहिला पाकिस्तानी; इथं पाहा रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर २ षटकार मारणारे ५ फलंदाज

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं कोणत्याही फलंदाजासाठी एक मोठं आव्हान असते. सध्याच्या घडीला तो क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.

टेस्ट असो वा मर्यादित षटकांचा सामना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोजक्याच फलंदाजांनी षटकार मारलाय. त्यात आता पाकिस्तानच्या बॅटरचा समावेश झालाय. विशेष म्हणजे कोणत्याही फॉरमॅटमध्ये बुमराहला षटकार मारणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरलाय.

दुबईतील आंतरारष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाकडून सलामीवीर साहिबजादा फरहान याने सर्वाधिक धावा केल्या. आपल्या ४० धावांच्या खेळीत त्याने ३ षटकार मारले. यातील दोन षटकार त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर मारले.

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार मारणारा तो पहिला पाकिस्तानी ठरलाय. याशिवाय आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात जसप्रीत बुमराहला दोन षटकार मारणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.

वेस्ट इंडिजच्या लेन्डल सिमन्स याने बुमराहाच्या गोलंदाजीचा सामना करताना एका डावात दोन षटकार मारले होते.

झिम्बाब्वेचा क्रिकेटर एल्टन चिगुम्बरा याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एका डावात २ षटकार मारले आहेत.

न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज मार्टिन गप्टिल हा देखील बुमराहला एका डावात दोन षटकार मारणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे.

ऑस्ट्रेलियन कॅमरून ग्रीन याच्या नावे देखील बुमराहच्या गोलंदाजीवर एका डावात दोन षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.