IND vs PAK: रवी शास्त्रींचे बाबर आझमला 'ओपन चॅलेंज', म्हणाले- "पहिल्या ५ चेंडूंमध्ये..."

Ravi Shastri challenge Babar Azam, IND vs PAK T20 World Cup 2026: बाबर आझम सध्या फलंदाजीत फॉर्मशी झुंजत आहे

आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, पाकिस्तानचा संघ १५ फेब्रुवारीला भारताविरूद्ध खेळणार असल्याचे निश्चित झाले.

एकीकडे हा निर्णय झाला असला तरीही पाकिस्तानचा बाबर आझम फॉर्मशी झुंजत आहे. त्याला सूर गवसण्यासाठी रवी शास्त्रींनी त्याला एक चॅलेंज दिले आहे.

रवी शास्त्री म्हणाले, "बाबर आझम हा प्रतिभावान आहे. पण सध्या तो अपेक्षांच्या ओझ्याखाली आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर होताना दिसतोय."

"जेव्हा तुम्ही कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर उभे असता तेव्हा ते ओझे तुमच्यावर असते. तुम्ही प्रत्येक वेळी दमदार कामगिरीच केली पाहिजे अशी चाहत्यांची अपेक्षा असते."

"बाबरने डावाच्या सुरुवातीला पहिल्या पाच चेंडूत मोठे फटके खेळले पाहिजेत. तो बाद होत असेल तरीही त्याची चिंता करत बसू नये. त्याने फटकेबाजी करायला हवी."

"फलंदाजी करताना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केले तरच बाबर आझमची फलंदाजी बहरेल आणि त्याच्या धावा वाढतील. फटके कसे खेळायचे ते त्याचे त्याने ठरवावे."

"गोलंदाज कशी गोलंदाजी करेल, आपल्याला कुठल्या भागात धावा जमवता येतील, कुठे चौकार-षटकार मारणे जास्त सोयीचे पडेल या विचाराने फटकेबाजी केली पाहिजे."

"फलंदाजी करताना बचावात्मक विचार सोडून दिला तर बाबरला खेळताना खूप हलके वाटेल आणि त्यामुळे कदाचित त्याच्या बॅटमधून मोठे फटके जास्त निघू शकतील."

"बाबर आझम हा अनुभवी आहे. तो सामना आणि खेळपट्टीनुसार स्वत:ची फलंदाजी बदलू शकतो. पण त्याला हा बदल लवकर करावा लागेल, नाहीतर खूप उशीर होईल."

"७ ते १६ ही षटके महत्त्वाची असतात. या वेळेत मोठे फटके मारताना जोखीम असते, पण तरीही त्याचा अनुभव पाहता तो ही जोखीम उचलू शकतो", असे शास्त्री म्हणाले.