"नेपाळने भारताविरूद्ध २३० धावा झोडल्या, पाकिस्तान तर..."; माजी क्रिकेटरने उडवली खिल्ली

आशिया चषकामध्ये भारताच्या गोलंदाजीवरून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत

भारतीय चाहत्यांना आता मायदेशात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेध लागले आहेत. या स्पर्धेसाठी BCCI ने टीम इंडियाची घोषणा केली. आशिया चषकासाठी निवडलेल्या खेळाडूंमधूनच विश्वचषकासाठीचा संघ निवडण्यात आला आहे. ही स्पर्धा म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे.

आशिया चषक स्पर्धेची पहिली फेरी पार पडली असून भारत व पाकिस्तान हे दोन संघ पुढील फेरीत गेले आहेत. पहिल्या फेरीत भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. नेपाळ विरूद्ध भारताने १० गडी राखून सामना जिंकला.

नेपाळच्या फलंदाजांनी भारताविरूद्ध २३० धावा केल्या. या मुद्द्यावरून भारताच्या गोलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने भारतीय गोलंदाजीची खिल्ली उडवत एक छुपा संदेशही दिला.

दानिश म्हणाला, "नेपाळसारख्या संघाकडे तुलनेने नवखा संघ म्हणून पाहिले जाते. त्यांच्या ताफ्यात फारसे अनुभवी फलंदाज नाहीत. असे असतानाही भारतीय संघाच्या दमदार गोलंदाजीपुढे नेपाळच्या फलंदाजांनी २०० पार मजल मारून मोठा पराक्रम केला."

"मैदानात गोलंदाजांची निवड करताना रोहित शर्मा गोंधळलेला दिसतो. तीनशेपार धावांच्या लक्ष्याच्या भारताचे गोलंदाज बचाव करू शकतील की नाही, याबाबत रोहितला खात्री नसल्याचे दिसते. त्यामुळे भारतीय निवडकर्त्यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजीकडे व गोलंदाजांच्या निवडीकडे जास्त लक्ष द्यायला हवे"

"नेपाळचा संघ नवखा असूनही भारतीय गोलंदाजांच्या पुढ्यात २३० धावा करतो. मग पाकिस्तानसारखा अनुभवी आणि धडाकेबाज फलंदाजांचा संघ भारतीय गोलंदाजीचा कसा समाचार घेईल याची कल्पनाही करता येऊ शकत नाही," अशा शब्दांत कनेरियाने