"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

Shoaib Akhtar No Handshake IND vs PAK Asia Cup 2025 : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याआधी व नंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले

भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध सहज विजय मिळवला. या सामन्याआधी आणि नंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकशी हस्तांदोलन टाळले.

पाक क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी कर्णधार भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत आला पण भारतीय खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला आणि आपला नकार स्पष्टपणे दर्शवला.

घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.

तो म्हणाला, "भारताने पाकिस्तानचा ज्या पद्धतीने पराभव केलाय, त्यावर मला काहीच सूचत नाहीये. जे घडलं त्यावर मी नि:शब्द आहे. पाकिस्तान फार वाईट हरला."

"भारतीय संघाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पण या गोष्टीला राजकीय रंग देऊ नका. क्रिकेट हा खेळ आहेत, त्याला खेळाप्रमाणेच राहू द्या, त्यात राजकारण नको."

"पाकिस्तानचे जाणकार भारतीय संघाचे कौतुक करत आहेत, ते कुठेही क्रिकेट व राजकारणाची सळमिसळ करत नाहीयेत. या विषयावर आम्हीही खूप काही बोलू शकतो."

"हस्तांदोलन करायला काहीच हरकत नव्हती. मला वाटतं की हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे खेळभावनेचा आदर व्हायला हवा होता, त्यांनी शेक-हँड करायला हवं होतं"

"भांडणं, वादविवाद प्रत्येक ठिकाणी होत असतात. घरातही वाद होतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या गोष्टी राजकीय स्तरावर येऊन याल आणि अशी वर्तणूक कराल"

"माझ्याकडून हे शक्य झालं असतं. मी तिथे असतो तर मी प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन केले असते. पोस्टमॅच प्रेझेंटेशनमध्ये सलमान गेला नाही ते त्याने योग्यच केले," असे अख्तर म्हणाला.