Join us

बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 21:35 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले. सुपर-४ फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ गडी राखून सहज विजय मिळवला.

2 / 8

सलामीवीर साहिबझादा फरहान याच्या ५८ धावा आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या बळावर पाकिस्तानने भारताला १७२ धावांचे आव्हान दिले होते.

3 / 8

पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अभिषेक शर्माच्या धडाकेबाज ७४ धावांच्या खेळीपुढे पाकिस्तानी गोलंदाजांचा जराही निभाव लागला नाही.

4 / 8

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंचीही अभिषेक शर्माने तुफान धुलाई केली. टीम इंडियातील खेळाडूंच्या कामगिरीचे पाकिस्तानातूनही कौतुक होत आहे.

5 / 8

पण याचदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याने मैदानावर अभिषेक-गिल जोडीशी वाद घातल्यानंतर त्याच्या बायकोने केलेली पोस्टदेखील चर्चेत आलीये.

6 / 8

हॅरिस रौफ आणि पाकिस्तानी खेळा़डू हे भारतीय क्रिकेटपटूंना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. तशातच रौफची पत्नी मुझना मसूद मलिक हिनेदेखील भारतीयांना डिवचले आहे.

7 / 8

तिने हॅरिस रौफचा ६-० असे आकडे दाखवतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि त्यावर लिहिले की, पाकिस्तान सामना हरला पण युद्ध जिंकला!

8 / 8

पाकिस्तानने एक खोटा दावा केला होता की, युद्धात पाकने भारताची ६ मिसाईल्स पा़डली. त्यावरून ६-० असा डिवचण्याचा प्रयत्न रौफ आणि त्याच्या पत्नीने केले आहे.

टॅग्स :आशिया कप २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानअभिषेक शर्माशुभमन गिलपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ