शाहीनच्या पहिल्याच षटकात वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही फलंदाजाने षटकार खेचला नव्हता. तो पराक्रम आज रोहितने केला. यापूर्वी रोहितने वन डेत पहिल्या षटकात २०१८ ( वि. दक्षिण आफ्रिका ( मॉर्ने मॉर्कल)) आणि २०१९ ( वि. बांगलादेश ( मोर्ताझा) यांना षटकार खेचले आहेत.
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावणारा गिल हा चौथा युवा भारतीय ठरला. त्याने २४ वर्ष व २ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. यापूर्वी रोहित २१ वर्ष व ६३ दिवस ( २००८), सुरेश रैना २१ वर्ष व २१२ दिवस ( २००८) आणि विराट कोहली २३ वर्ष व १३४ दिवस ( २०१२) यांनी हा पराक्रम केला होता.
आशिया चषक ( वन डे) स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक ६ वेळा ५०+ धावा करण्याचा पराक्रम रोहितच्या नावावर आहे. मार्वन अटापटू, शाकिब अल हसन, कुमार संगकारा आणि मुश्फिकर रहिम यांना प्रत्येकी ३ वेळा अशी कामगिरी करता आली आहे.
आशिया चषक ( वन डे ) स्पर्धेतील रोहितने ९ वेळा ५०+ धावा केल्या आहेत आणि त्याने आज सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या यांच्याशी बरोबरी केली. कुमार संगकाराने सर्वाधिक १२ वेळा हा टप्पा ओलांडलाय.
पाकिस्तानविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये ओपनर्सने सर्वाधिक १३ वेळा शतकी भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विक्रमाशी आज भारताने बरोबरी केली. इंग्लंडच्या सलामीवीरांना ११वेळा हे करता आलंय, त्यापाठोपाठ वेस्ट इंडिज ( ९) व दक्षिण आफ्रिका ( ८) यांचा क्रमांक येतो.