विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या भात्यातून धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिले शतक झळकवताना विराट कोहलीनं आयसीसी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पाचव्यांदा सामनावीर पुरस्कार पटकवला. आयसीसी स्पर्धेत अन्य कुणालाही पाक विरुद्ध ३ पेक्षा अधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळालेला नाही.
इथं नजर टाकुयात कोहलीच्या पाकविरुद्धच्या जबरदस्त इनिंगचा सिलसिला कधीपासून सुरु झाला त्यासंदर्भातील खास स्टोरी
२०१२ मध्ये कोहलीनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा सामनावीर पुरस्कार पटकवला होता. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत कोहलीनं ६१ चेंडूत ७८ धावांची धमाकेदार इनिंग खेळली होती.
२०१५ मध्ये अॅडिलेडच्या मैदानात रंगलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोहलीच्या भात्यातून १२६ चेंडूत १०७ धावांची खेळी आली होती.
२०१६ च्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत कोहली पुन्हा एकदा कोहली पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरला. या सामन्यात पाकविरुद्ध त्याने ३७ चेंडूत ५५ धावांची मॅचला कलाणी देणारी खेळी केली होती.
२०२२ च्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक यांच्या लढतीत कोहलीनं ५३ चेंंडूत नाबाद ८२ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील लढतीत १११ चेंडूतील नाबाद १०० धावांच्या खेळीसह कोहलीनं आयसीसी स्पर्धेत पाक विरुद्ध पाचव्यांदा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकवला.