ODI Record : मैदानात उतरताच 'विराट' विक्रम! 'दादा' मागे पडला; इथं मास्टर ब्लास्टर सचिन जगात भारी!

Sachin Tendulkar To Virat Kohli Most Appearances For India In ODIs Record : इथं पाहा भारतीय संघाकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या आघाडीच्या ६ खेळाडूंची यादी

न्यूझीलंडविरुद्धच्या वडोदराच्या मैदानात फलंदाजीसाठी मैदानात उतरण्यापूर्वीच विराट कोहलीनं खास विक्रमाला गवसणी घातली.

शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंगसाठी मैदानात उतरताच विराट कोहलीनं क्रिकेटच्या मैदानातील दादा आणि भारतीय संघाची बांधणी करणारा कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले.

विराट कोहली वडोदराच्या मैदानात ३०९ वा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारताकडून सर्वाधिक वनडे खेळणाऱ्या आघाडीच्या पाचमध्ये त्याची एन्ट्री झाली आहे.

सौरव गांगुलीनं आपल्या कारकिर्दीत ३०८ वनडे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. या कालावधीत बराच काळ त्याने संघाचे नेतृत्व केल्याचेही पाहायला मिळाले.

दिग्गज राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताकडून त्याने ३४० वनडे सामने खेळले आहेत.

मोहम्मद अझरुद्दिनही भारतीय संघाकडून ३०० पेक्षा अधिक वनडे सामने खेळणारा खेळाडू आहे. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने ३३४ वनडे खेळल्याचा रेकॉर्ड आहे.

कॅप्टन कूल महेंद्रसिह धोनी भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारा दुसरा खेळाडू आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ३४७ वनडे खेळल्याचा रेकॉर्ड आहे.

टीम इंडियाकडूनच नव्हे तर आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वात आघाडीवर आहे. त्याने आपल्या मोठ्या कारकिर्दीत ४६३ वनडे सामने खेळले आहेत. हा एक विश्वविक्रमच आहे.